प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील कर्णपुरा भागात चक्क बिबट्या अवतरला. बिबट्याने शेतात चरणाèया शेळीचा फडशा पाडला. बिबट्या परिसरात आल्याचे समजताच या भागात मोठी खळबळ उडाली. ही माहिती वनविभागालाही देण्यात आली. वनविभागाचे पथक कर्णपुरा येथे दाखल झाले. पण बिबट्या काही मिळून आला नाही.
१० महिन्यांपूर्वीच एका बिबट्याला वनविभागाने या परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा बिबट्या आढळला. छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष करणसिंग काकस यांच्या शेतात आठ दिवसांपूर्वीच बिबट्या दिसला होता. काल दुपारी काकस यांचा गडी विजयसिंग पुंगडे शेतात शेळी चारत होता. त्याच वेळी शेजारच्या शेतातून एक बिबट्या बाहेर निघाला. काही कळण्यापूर्वीच त्याने शेळीवर हल्ला केला आणि तो शेळीला घेऊन उसाच्या शेतात शिरला. या घटनेनंतर पुंगडे यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरीही जमा झाले. पण तोपर्यंत बिबट्या उसात गायब झाला.