Home » , , » हरीस अहेमदला एक दिवसाची कोठडी

हरीस अहेमदला एक दिवसाची कोठडी

Written By Aurangabadlive on शनिवार, १५ डिसेंबर, २०१२ | १२:५५ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद : घरातील भाडेकरु असलेल्या महिलेस अश्लील एसएमएस करून दहा हजारांची खंडणी मागणाèया उच्चशिक्षित महम्मद हरिस अहेमद या तरुणास न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बीड येथील अजीजपुरा कारंजा रोडवर राहणारा असलेला मोहमंद हरीस इलीयास अहेमद याच्या घरात एक महिला परिवारासह भाड्याने राहात होती. दोघांत काही कारणावरून वाद झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हरीस याने महिलेच्या मोबाईलवर अश्लील एसएमएस करण्यास सुरुवात केली. तसेच अश्लील फोटो इ-मेल आणि फेसबुकवर टाकण्याची धमकी देत दहा हजारांची खंडणीही मागितली. महिलेच्या पतीने मुश्ताक अली रशिद अली याने दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या पथकाने हरीस अहेमद यास बीड येथून अटक करुन आणले. त्यास आज न्यायालयात हजर करण्यात आले असता ज्या मोबाईल वरुन आरोपीने अश्लील एसएमएस केले तो मोबाईल हस्तगत करायचा आहे, तसेच आरोपीकडे महिलेचे १८ अश्लिल फोटो आहेत ते त्याने कोठून मिळवले याचा तपास करायचा असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील शाम देशपांडे यांनी केला. अ‍ॅड. अशोक काकरे यांनी आरोपीच्या बचावात युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला केवळ एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.