प्रतिनिधी
औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीमधील २० हजार चौरस मिटर आकाराचा प्लॉट विकल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर दुसèया कंपन्यांच्या मदतीने बांधकाम करणाèया सत्यनारायण चांडक व इतर यांच्याविरुध्द कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करुन त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाèयांच्या न्यायालयाने दिले आहेत.
वासुदेव जयराम वाळके यांना औरंगाबाद येथे उद्योग उभारावयाचा असल्याने त्यांनी मधुकर भागवत सरोदे यांच्या मदतीने शेंद्रा एमआयडीसी येथील सी ८ या क्रमांकाचा २० हजार चौरस मिटरचा प्लॉट खरेदी केला होता. त्याचे पैसेही त्यांनी दिले. परंतु नंतर त्यांना असे आढळून आले की, त्यांचे लक्ष नाही असे पाहून सत्यनारायण चांडक यांनी मे रोड कॅम्प व अन्य एका कंपनीला या ठिकाणी बांधकाम करण्याची मुभा दिली. त्याच्या बांधकामावरुन वासुदेव वाळके यांच्या असे लक्षात आले की, आपल्याला विकलेल्या प्लॉटचा पुन्हा व्यवहार केलेला आहे. त्यामुळे त्यांनी चांडक यांच्या विरोधात संबंधित लवादाकडे प्रकरण दाखल केले. तेथे हे प्रकरण प्रलंबीत असतानाच चांडक यांनी पुन्हा बांधकाम परवानगीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे कळाल्यामुळे वाळके यांनी अॅड. एम.एन. देशमुख यांच्यामार्फत मुख्य न्यायदंडाधिकाèयांच्या न्यायालयात कलम १५६ (३) अन्वये प्रकरण दाखल केले. त्यात न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले व त्याआधारे चांडक व मुंबई व कोल्हापूर येथील दोन असोसिएट विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अॅड. देशमुख यांना अॅड. व्ही.एन. चव्हाण यांनी सहकार्य केले.