प्रतिनिधी
औरंगाबाद : गाडीचा धक्का म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या व्यक्तीस सफारी चालकाने शिवीगाळ करत लोखंडी फायटरने मारहाण केल्याची घटना जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या रत्नाकर म्हस्के यांची पाच गॅ्रम वजनाची सोन्याची अंगठीसह १ हजार आठशे रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नंदनवन कॉलनीतील रत्नाकर शंकरराव म्हस्के (४४) हे दि. १३ रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरुन न्यू इंडीया इन्शूरन्स कंपनीकडे जात होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर त्यांना सफारी (एमएच २०, ९९१) या गाडीचा धक्का लागला. याबाबत म्हस्के जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना सदरील सफारी गाडी चालकाने शिवीगाळ करत लोखंडी फायटरने मारहाण केली. तसेच सोन्याची अंगठी व रोख १ हजार आठशे रुपये काढून घेतले. या प्रकरणी रत्नाकर म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन सफारी चालकाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार लोखंडे करीत आहेत.