प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दि. १६ रोजी शहरात शिवसेना मराठवाडास्तरीय पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती खा. चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खा. खैरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहरावर खूप प्रेम केले. बाळासाहेब गेल्यानंतर उध्दव ठाकरे पहिल्यादाच शहरात येत आहेत. या वेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहील. हा कुठल्याही प्रकारचा राजकीय मेळावा नसून ती कौंटूबिक भेटच म्हणावी लागेल. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी ११ वाजता होणाèया या मेळाव्यास मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील शिवसेना खासदार, आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, नगरसेवक, जि.प, पं.स. सदस्य, पदाधिकाèयांचा समावेश असेल. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांच्या निवडक क्लिपींग तसेच छायाचित्र दाखविण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेस महापौर कला ओझा, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, बंडू ओक, माजी आ. संदीपाान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, युवा सेनेचे ऋषिकेश खैरे आदी उपस्थित होते.