प्रतिनिधी
औरंगाबाद : पत्नीला जाळून मारून फरार झालेल्या पतीला पोलिसांनी तमाशा फडावर अटक केली.
मुकुंदवाडीतील राजनगर येथील रहिवासी सुरेश बाबू गिरी (४८) याचे पत्नी बेबी (४२) हिच्याशी घरगुती कारणांवरून सतत खटके उडायचे. ११ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांच्यात भांडण झाले. सुरेश गिरी याने रागाच्या भरात बेबीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटना घडल्यापासून सुरेश गिरी फरार होता. बेबी गिरी हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात पतीनेच जाळल्याचे सांगितले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुरेश गिरी भिका भीमा तमाशा मंडळासोबत असल्याची माहिती खबèयाने पोलिसांना दिली. हे तमाशा मंडळ शेकटा येथे आल्याचे पोलिसांना समजले. पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. एन. घुले यांच्या पथकाने शेकटा येथे जाऊन त्याला अटक केली. तो तमाशा फडावर मजूर म्हणून काम करायचा. सुरेश गिरी याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.