Home » , , » खतरनाक गुन्हेगार जेरबंद

खतरनाक गुन्हेगार जेरबंद

Written By Aurangabadlive on मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२ | ९:२१ AM

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
प्रतिनिधी
औरंगाबाद : दरोडा, खून, लुटमारी अशा गंभीर गुन्ह्यात पोलिसांना चकमा देणारा खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात क्रांतीचौक पोलिसांना यश आले. या आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हे आपल्या पथकासह ठाणे हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान त्यांनी रेल्वेस्टेशन भागात संशयास्पद जाणाèया एका दुचाकीस्वारास थांबण्याचा इशारा केला. दुचाकीस्वार न थांबता धुमस्टाईलने भरधाव निघाला. यामुळे पोलिसांचा संशय अजुन बळावला. त्यांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्यास पोलीसी खाक्या दाखवला असता तो खतरनाक गुन्हेगार निघाला.रामqसग त्र्यंबक भोसले (२९, रा. सलबतपूर, ता. नेवासा) असे त्याचे नाव असून त्याच्या विरूध्द नेवासा, गंगापूर पोलीस ठाण्यांमध्ये खून, दरोडे, लुटमारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी गेल्या दोन वर्षापासून पोलिसांना चकमा देत होता. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कामगीरी क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उन्मेश थिटे, जमादार नाना पटारे, मुनीर पठाण, संतोष आहेरकर, प्रकाश डोंगरे आqदनी बजावली.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.