प्रतिनिधी
औरंगाबाद : लग्न सोहळ्यात मग्न असलेल्या वèहाडींच्या धावपळीचा फायदा घेत चोरट्याने अनेकांचे पाकीट तसेच बॅग लंपास केल्या. या घटनेत जवळपास २ लाख ६२ हजाराचा ऐवज चोरीला गेला असून नागरिकांनी एका अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना काल दुपारी आरटीओ कार्यालयाजवळील टुरिस्ट होम येथे घडली.
अॅड. योगेश प्रमोद बोरा हे आपल्या चुलत भावाच्या लग्नसमारंभासाठी टुरिस्ट होम येथे गेले होते. दुपारच्या सुमारास सर्व वèहाडी मंडळी लग्नाच्या धामधुमीत असतांना चोरट्याने संधी साधून बोरा यांची एकबॅग लंपास केली. त्या बॅगमध्ये रोख रक्कम, सोन्याचे झुमके, बाजुबंद असा १ लाख ७० हजारांचा ऐवज होता. तसेच तेथूनच प्रतिक कमलकिशोर कासलीवाल यांचे २० हजार रूपये असलेले पाकीट चोरट्याने लांबविले. यावेळी अन्य वèहाडींचाही ऐवज चोरट्याने पळविला. या घटनेत एकूण २ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. एका संशयीत अल्पवयीन मुलास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी योगेश बोरा यांच्या फिर्यादीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.