Home » , , » वर्षभरापासून पोलिसांना चुकारा देणारे चौघे अटक

वर्षभरापासून पोलिसांना चुकारा देणारे चौघे अटक

Written By Aurangabadlive on गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२ | ९:५० PM

प्रतिनिधी
औरंगाबाद : वेगवेगळ्या गुन्ह्यात मागील अनेक वर्षापासून फरार असलेल्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यातील चारही आरोपी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यामधील आहेत. मोहंमद पाशा मोहंमद गफूर (४८, रा. काबरानगर, गारखेडा परिसर), मोहमंद अफसर मोहंमद गफूर (३६, रा. सुतगिरणी परिसर), मोहंमद हनिफ मोहम्मद गफूर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून तिघेही कलम ३२४ भादंवि गुन्ह्यातील आहे. ते २० वर्षांपासून ते फरार होते. तसेच राजपाल रघुवीरqसग सोधे (४५, रा. मंजूरपुरा, हर्षनगर) असे अटक केलेल्या चौथ्या आरोपीचे नाव आहे. तो कलम २९५ या गुन्ह्यात मागील १२ वर्षापासून फरार होता. ही कारवाई मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त तथा पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, साईनाथ महाडीक, जारवाल, नवनाथ परदेशी, भानुदास पवार, प्रभाकर राऊत, तांदळे यांच्या पथकाने केली. चौघांनाही क्रांतीचौक पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.