Home » , , » विद्यापीठात चित्रपट रसग्रहण कार्यशाळा

विद्यापीठात चित्रपट रसग्रहण कार्यशाळा

Written By Aurangabadlive on गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२ | ९:५१ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात चित्रपट रसग्रहण कार्यशाळेस प्रारंभ झाला. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध शायर व गीतकार बशर नवाज होते. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चित्रपट रसग्रहण तज्ज्ञ अशोक राणे उपस्थित होते.
विभागप्रमुख डॉ.शशिकांत बèहाणपूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला आणि चित्रपट
रसग्रहण कार्यशाळेचे महत्त्व विशद केले, उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना नरेंद्र चपळगावकर यांनी चित्रपट पाहणे ही कला आहे, ज्याप्रमाणे शिल्प समजून घेण्यासाठी आकार ज्ञान आवश्यक आहे, त्याप्रमाणे चित्रपट कला पाहणे व समजण्यासाठी संस्कारक्षम असणे महत्त्वाचे ठरते. उपेक्षित असलेला सिनेमाचा अभ्यास ही मनास क्लेशदायक बाब आहे, असे सांगत अशोक राणे यांनी चित्रपट रसग्रहणाचे महत्त्व सांगितले. चित्रपट पाहणे म्हणजे जीवन समजणे होय अशी व्यापकता स्पष्ट करीत त्यांनी आपल्यावर झालेले संस्कार व चित्रपट आस्वादाचे कंगोरे स्पष्ट केले. जे आहे त्यापेक्षा त्या पलीकडेच विश्व चित्रपटात असते. त्याचा अनुभव घेत ते समजणे म्हणजे चित्रपट रसग्रहण होय, असे विचार व्यक्त केले. प्रत्येक संस्कृतीचा एक विचार असतो. प्रत्येकाची एक जीवन प्रणाली असते. त्या ठिकाणचा अनुभव घेत आनंद घ्यावयाचा असतो. चित्रपट माध्यम हे खूप व्यापक आहे. तसेच जीवन विषयक प्रगल्भतेसाठी देखील चित्रपटाचा अभ्यास मार्गदर्शक ठरणारा असतो, असे विचार प्रकट केले. या कार्यक्रमास अनिल फळे, अशोक देशपांडे, सुधीर सेवेकर, डॉ. अशोक बंडगर, गजानन दांडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.