Home » , , » ३५० रुग्णांवर होणार मोफत प्लास्टिक सर्जरी

३५० रुग्णांवर होणार मोफत प्लास्टिक सर्जरी

Written By Aurangabadlive on गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२ | ९:४७ PM

लायन्सच्या शिबिरात ७०० जणांची तपासणी
प्रतिनिधी/१४ डिसेंबर
औरंगाबाद : लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा, महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अ‍ॅण्ड केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित स्व. पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला.
समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. व्यासपीठावर अमेरिकेतील ख्यातनाम डॉ. राज लाला आणि डॉ. विजय मोराडिया, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे श्री. जैन, लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. रवींद्र कुलकर्णी, अध्यक्ष विमलकुमार टिबडीवाला, डॉ. श्रीमती मोराडिया, सिस्टर करेन आदी उपस्थित होते.  या प्रसंगी डॉ. विकास आमटे यांनी डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत, केवळ राजकीय पाqठब्याअभावी या महामानवाला नोबेल पारितोषिक मिळू न शकल्याची खंत व्यक्त केली. लायन्स क्लबच्या सेवाकार्याचा गौरव करतानाच, त्यांनी अशी शिबिरे आपल्याला अजूनही आयोजित करावी लागत आहेत, याबद्दल खंत व्यक्त केली. चांगला आहार, चांगले पाणी, चांगल्या आरोग्य सुविधांच्या अभावामुळे वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असणे हे आरोग्यपूर्ण समाजाचे लक्षण नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. दीक्षित यांच्या सेवाकार्याची परंपरा डॉ. राज लाला आणि डॉ. विजय मोराडिया हे पुढे चालवत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक गरजूपर्यंत पोचण्यात शासन अपयशी ठरते आहे, खूप डॉक्टर, खूप वकील, खूप पोलिस असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शासकीय रुग्णालयांची अवस्था अतिशय वाईट असून, लायन्सच्या या कार्याचे मोल त्यामुळेच खूप मोठे आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम दरख यांनी केले. अध्यक्ष विमलकुमार टिबडीवाला यांनी शिबिर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.  सूत्रसंचालन विशाखा रुपल यांनी केले तर रवींद्र करवंदे यांनी आभार मानले. या शिबिराअंतर्गत आज सातशेवर रुग्णांची तपासणी करण्यात येऊन शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या साडेतीनशे रुग्णांची निवड करण्यात आली. त्यांना वेळ आणि तारीख देण्यात आली असून, पुढील चार दिवस एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एमजीएममध्येच १७ डिसेंबरपर्यंत सकाळी आठ ते नऊ या वेळात नवीन रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यातील आवश्यकता असणाèया रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.