Home » , , » आता वीज कनेक्शन ४८ तासात

आता वीज कनेक्शन ४८ तासात

Written By Aurangabadlive on बुधवार, १२ डिसेंबर, २०१२ | ११:१२ AM

प्रतिनिधी
औरंगाबाद : वीज कनेक्शन करिता पोल नाही, मीटर नाहीत, वायर नाही, बघू, पाहू, नंतर या! हे उत्तर महावितरणाकडून मिळणार नाही. आता वीज कनेक्शन हवे असल्यास महावितरणच्या जवळच्या शाखेत अर्ज करा आणि ४८ तासात वीज कनेक्शन घ्या. महावितरण औरंगाबाद परिमंडलाच्या उपक्रमा अंतर्गत सर्व शाखा कार्यालयात वीज पुरवठा देण्यासाठी शुल्क विवरणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. महावितरणच्या पारदर्शी उपक्रमातून गेल्या चार महिन्यात ४४ हजार २७९ प्रलंबित व नवीन वीज कनेक्शन देण्यात आले आहेत.
वीज कनेक्शनसाठी महिनो-महिने qकवा वर्षानुवर्षे वाट पाहत बसणे, महावितरण कार्यालयाकडे खेटे मारणे. हे दिवस आता महावितरणमध्ये राहिले नाहीत. वीज जोडणी पाहिजे असल्यास वीज कनेक्शनच्या अर्जातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन वीज शुल्क जवळच्या महावितरण शाखा कार्यालयात भरणा केल्यास ४८ तासात वीज कनेक्शन देण्याचा उपक्रम औरंगाबाद परिमंडलाचे मुख अभियंता शंकर qशदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. महावितरणच्या सर्व शाखा कार्यालयात दर्शनीय भागात कोटेशनसाठी लागणारा शुल्क, विद्युत आकार व त्यासाठी लागणाèया कागदपत्रांच्या यादीचे बोर्ड तयार करून लावण्यात आले आहेत.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.