Home » , , , » पाणी पुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

पाणी पुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

Written By Aurangabadlive on शनिवार, ८ डिसेंबर, २०१२ | ११:२९ AM


पिशोर : दोन अधिकाèयांसह ठेकेदारास अटक, आरोपींच्या घरांची झाडाझडती
एकूण आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल
प्रतिनिधी
औरंगाबाद : भारत निर्माण प्रकल्प योजना अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत पिशोर येथे जवळपास २१ लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी तिघांना अटक केली. त्यात दोन शासकीय अधिकारी आणि एका ठेकेदाराचा समावेश आहे. या प्रकरणी एकूण आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून जि.प. पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता सुधाकर मालबा डावखरे, तत्कालीन ग्रामसेवक सखाराम रामभाऊ दिवटे, आणि योजनेचे काम घेतलेला ठेकेदार सदाशिव रंगनाथ थोरात या तिघांना अटक करण्यात आली आहे.
एसीबीच्या पथकाने आज सकाळी आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात काही महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सं. दे. बाविस्कर यांनी याबाबत सांगीतले की, सन २००६ मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर आणि या अंतर्गत शफेपूर, दिगर, वाघुळखेडा या चार गावांसाठी वर्धीत वेग ग्रामीण पाणी पुरवठा ही २ कोटी ७८ लाख रुपयांची शासकीय योजना मंजूर झाली होती. ही शासनाची योजना मंजूर होताच शासकीय अधिकाèयांसह ठेकेदाराला जणू काही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच सापडली. त्यांनी साखळी पध्दतीचा वापर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे २० लाख ९४ हजार ८६५ रूपयांचा घोटाळा केला. पुढील तपासात हा आकडा वाढणार आहे. या घोटाळ्याची कुणकुण त्याचवेळी स्थानिक नागरिकांमार्फत ए.सी.बी. ला लागली होती. तेव्हा पासून एसीबी विभाग सतर्क झाला. योजनेचा सखोल अभ्यास करून आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवले. हा बनवा बनवी चा प्रकार उघडकीस येताच एसीबीचे पोलिस उपअधिक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी सुधाकर डावखरे, सखाराम रामभाऊ दिवटे आणि ठेकेदार सदाशिव थोरात या तिघांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी डावखरे हा सध्या जि.प. पाणी पुरवठा उपविभाग पैठण येथे कार्यरत आहे. तर तत्कालीन ग्रामसेवक दिवटे हा सध्या वैजापुर पंचायत समिती कार्यालयात काम करीत आहे. अटक केलेल्या तिघा आरोपींसह तत्कालीन विस्तार अधिकारी गोरखनाथ शंकरराव पवार, पिशोर ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे तत्कालीन अध्यक्ष जनार्धन जयराम मोकासे, सामाजिक लेखा परिक्षण समितीचे तत्कालीन अध्यक्ष तथा सदस्य, पिशोर ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे तत्कालीन सदस्य या आठ जणांविरूध्द पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे एसीबी विभागाने सांगितले. दरम्यान अटक केलेल्या आरोपींच्या घराची झाडाझडती आज पहाटे पाच वाजेपासूनच सुरू करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. एसीबीने आरोपींच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली. काही जणांनी लाखो रुपयांची मालमत्ता जमविली असल्याचेही पुढे आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक बाबाराव मुसळे, ब्रम्हदेव गावडे, सुरेश वानखेडे, कैलास प्रजापती, साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, शशीकांत qसगारे, सय्यद, श्यामसुंदर कौठाळे, किशोर पवार, रायकर, टाक यांनी केली.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.