प्रतिनिधी
औरंगाबाद : शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या पथकाने राजेश महादेव सोळंकी (२२, रा. सिल्लोड) यास संशयावरुन अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने घरफोडी केली असल्याची कबुली दिली. तसेच घरफोडीच्या गुन्ह्यातील पाच तोळे सोने व चार तोळे चांदी असा दीड लाख रुपयांचा ऐवज पोलिसांना काढून दिला.
या वेळी सोळंकी याने पृथ्वीलोक कॉलनी, पडेगाव येथे घरफोडी केल्याचे सांगीतले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त सोनाथ घार्गे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोहेकॉ दत्तु गायकवाड, विलास काळे, प्रकाश गायकवाड, विजयqसग राजपूत, शेरा पठाण, शेख बाबर, साहेबराव डकले, विजय वानखेडे, प्रदीप qशदे, स्वाती बनसोडे आदींनी केली.