प्रतिनिधी
औरंगाबाद : शेतीच्या वादातून पुतण्याने काकाच्या पोटात तसेच हातावर धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील शेकटा येथे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
गोqवद दादा भवर (७०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गोविंद भवर आणि त्याचा पुतण्या देवीदास ज्ञानेश्वर भवर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचा वाद आहे. गोविंद ने काही दिवसांपूर्वी शेत विकले होते. त्या शेतात देवीदास हा बोअर घेत असतांना तो शेत मालकाने बंद पाडला. आपला काका गोqवदच्या सांगण्यावरूनच हे घडत आहे, असे समजुन देवीदासच्या डोक्यात काकाविषयीचा राग होता. काल रात्री दोघा काका पुतण्यात याच कारणावरून पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, चिडलेल्या देवीदासने गोविंद च्या पोटात तसेच हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यात गोqवद हा जागीच कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक (गृह) संदीप जाधव, बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाèयांनी घटनास्थळी धाव घेतली. गोविंदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात पाठविला. या प्रकरणी मारोती उत्तम भवर यांच्या फिर्याद वरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. दरम्यान आज दुपारी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.