पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा
प्रतिनिधी
औरंगाबाद : घराचा दुसरा मजला बांधण्यासाठी माहेराहून १ लाख रुपये आण, अन्यथा जीवे मारु अशी धमकी देऊन विवाहितेचा शारिरीक व माणसिक छळ करणाèया सासरच्या पाच जणांविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना संजय शिंदे (२६, रा. भाग्यनगर) या विवाहितेस सासरचे सुशिला काशिनाथ शिंदे , पती संजय काशिनाथ शिंदे , ज्ञानेश्वर तांदळे, शोभा ज्ञानेश्वर तांदळे, रवींद्र काशिनाथ शिंदे (सर्व रा. मिलकॉर्नर) यांनी संगणमत करुन घरावर दुसरा मजला बांधण्यासाठी माहेराहून १ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. पैसे घेऊन येत नसल्याने कल्पना हिस शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कल्पना शिंदे यांच्या फिर्यादीवरुन वरील नमुद सासरच्या पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यमपुरे करीत आहेत.