प्रतिनिधी
औरंगाबाद :
देवदर्शनासाठी गेलेल्या इसमाचे घर फोडून चोरट्यांनी हजारोचे दागिने लंपास केले. ही घटना काल दुपारी पुंडलीकनगर भागात घडली.
विश्वास दिगंबरराव भालेराव (५१, रा. पुंडलिकनगर) हे काल दुपारी घरास कुलूप लाऊन सातारा येथे खंडोबाच्या दर्शनासाठी गेले होते. या दरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले ४७ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. भालेराव हे दुपारी अडिच वाजेच्या सुारास घरी आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार साबळे करीत आहेत.