प्रतिनिधी
औरंगाबाद : सिग्नल तोडून भरधाव जाणाèया दुचाकीस्वारास पकडणाèया वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाèयास शिवीगाळ केल्याची घटना एपीआय कॉर्नर येथे घडली. सदरील मोटारसायकल स्वाराविरुद्ध मुकूंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरहिन जाकेर (२०, रा. टाईम्स कॉलनी) असे आरोपी दुचाकीस्वाराचे नाव आहे. फरहिन हा दि. १४ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एपीआय कॉर्नर येथून सिग्नल तोडून मोटारसायकलवरुन (एमएच २०, सीसी ४७०६) भरधाव जात होता. ही बाब वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी काकासाहेब कौतिकराव अधाणे यांच्या लक्षात येताच त्यांनी पाठलाग करुन दुचाकीस्वारास पकडले. पकडल्याचा राग आल्याने फरहिन याने पोलीस कर्मचारी अधाणे यांना शिवीगाळ केली. तसेच हुज्जत घालत शर्टाची कॉलर धरुन बटन तोडले. या प्रकरणी अधाणे यांच्या फिर्यादीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शिवीगाळ, हुज्जत आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यावरुन फरहिन जाकेर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तांदळे करीत आहेत.