घाटीत सीसीटीव्ही बसविल्यावरून महिला अधिकाèयांचा संताप
प्रतिनिधी
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे महिला अधिकाèयांच्या संतापाचे कारण बनले असून, प्रशासकीय अधिकारी मगर या कॅमेèयाला जोडलेल्या टीव्हीवर महिलांना न्याहाळतो, अशी त्यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांच्या केबिनमधील सीसीटीव्हीचे कनेक्शन कट करावे, अशी मागणी या महिला अधिकाèयांनी केली आहे.
या तक्रारींची चौकशी करण्यासाठी अँनाटॉमी विभागप्रमुख डॉ. छाया दिवाण यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार आपल्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कॅमेèयांमार्फत कामचुकार कर्मचारी तसेच विनापरवानगी ये- जा करणारी मंडळी लक्षात यावी, म्हणून कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. कार्यालयातील लेखा विभाग, आस्थापना विभाग आणि इतर विभागांत हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांच्या दालनात आहे. प्रशासकीय अधिकारी संजय मगर यांच्या केबिनमधील संगणकावर सीसीटीव्हीचे चित्रण दिसते. प्रशासकीय अधिकारी हे महिला कर्मचारी, अधिकारी यांना यामाध्यमातून न्याहाळतात, त्यामुळे त्यांच्या दालनातील सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद करा, अशी मागणी महिलांनी अधिष्ठातांकडे केली. या तक्रारीची माहिती मगर यांना मिळाली. दोन दिवसांनंतर त्यांची पत्नी नातेवाईकांना घेऊन मगर यांच्या कार्यालयात गेली. त्यांनी तेथील महिलांना उद्देशून तुम्ही ऐश्वर्या आहात का? असे विचारत उपहासात्मक टीका केली. या प्रकारानंतर सर्व महिलांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित दामले यांच्याकडे दुसरी तक्रार केली. दरम्यान, नागपूरला बैठकीला गेलेले अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे सकाळी कार्यालयात परतले. महिला कर्मचारींनी त्यांची भेट घेऊन दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकाराची माहिती दिली. लेखी तक्रार प्राप्त झालेली असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. छाया दिवाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. भोपळे यांनी सांगितले.