प्रतिनिधी
औरंगाबाद : बससमोर उभ्या तरुणाला बाजूला होण्यास सांगितल्यावरून एक तरुण आणि कंडक्टरमध्ये चांगलेच भांडण झाले. या भांडणात तरुणाने कंडक्टरच्या कानाचा लचकाच तोडला. शहरातील हर्सूल टी-पॉइंट येथे ही घटना घडली.
एसटीचे कंडक्टर प्रल्हाद बप्पाजी राख (२९, रा. एकनाथनगर, ता. अंबड, जि. जालना) हे ड्यूटीवर होते. हर्सूल टी-पॉइंट येथून त्यांची बस जात असताना दत्ता भागाजी भोसले (२९, रा. भवन, सिल्लोड) हा बससमोर उभा असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्यास बससमोरून बाजूला होण्यास सांगितले. त्याला त्याचा राग आल्याने दोघांत चांगलेच भांडण झाले. या वेळी रागाच्या भरात दत्ता याने प्रल्हाद यांच्या पोटरीस चावा घेतला. या प्रकरणी प्रल्हाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.