Home » , , » हळद लागण्याआधीच काळाचा घाला

हळद लागण्याआधीच काळाचा घाला

Written By Aurangabadlive on मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२ | १०:५६ AM


युवकाचा मातीच्या ढिगाराखाली दबून मृत्यू
प्रतिनिधी
औरंगाबाद : वीटभट्टीसाठी माती उपसताना ढिगाराखाली दबून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मांडवा (ता. गंगापूर) परिसरात आज सोमवारी सकाळी घडली. मृत युवकाचे ३० डिसेंबरला लग्न ठरले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडणा परिसरातील नाल्यातून वीटभट्टीसाठी अवैध माती उपसा करण्यात येत आहे. या ठिकाणी विनोद रवींद्र नरवडे (वय २१, रा. तथागतनगर, बिडकीन, ता. पैठण) हा मजूर माती व वाळू उपसण्याचे काम करीत होता. यासाठी खोलवर खड्डे करण्यात आले. काम करीत असतानाच ढिगार कोसळून विनोद मातीखाली दबला गेला व त्याचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. सोबतच्या मजुरांनी त्यास बाहेर काढले व बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. रुग्णालयात कुणी नसल्याने त्यास औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात (घाटी) हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत विनोद नरवडे याचे ३० डिसेंबरला लग्न ठरले होते. विनोदचे वडील रवींद्र नरवडे बिडकीन ग्रामपंचायतीत शिपाई आहेत. विनोदमागे आई-वडील व एक लहान भाऊ आहे. त्याच्या लहान बहिणीचा पंधरा दिवसांपूर्वी आजाराने मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.