प्रतिनिधी
औरंगाबाद : उत्तरकार्याचा कार्यक्रम आटोपून परतणारी जीप आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीपमधील एक जण जागीच ठार झाला, तर एका वृद्धेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. १३ जण गंभीर जखमी झाले.
वासडी (ता. कन्नड) येथे महिला नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी (रोहिणी, ता. चाळीसगाव) येथील मंडळी वासडी येथे आली होती. ही मंडळी कार्यक्रम आटोपून घराकडे टाटासुमो जीपने परतत असताना कन्नड चाळीसगाव रस्त्यावरील अंधानेर शिवारातील भवानीनगरजवळ रस्त्यावर चाळीसगावहून कन्नडकडे येणारा टड्ढक यांच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीपमधील अशोक पुंडलिक सांगळे (४०) हा जागीच ठार झाला, तर हौसाबाई मोतीराम डिघोळे (७०), संगीता विक्रम सांगळे (३५), ज्योती प्रभाकर डिघोळे (३०), सखूबाई उद्धव निळेकर (६०), रावसाहेब निवृत्ती आव्हाड (३०), अंकित प्रभाकर डिघोळे (४), शोभा सुधाकर डिघोळे (३०), सुधाकर रामकिसन डिघोळे (३५), बाबासाहेब देवराव वाघ (५०), ताराबाई विठ्ठल ढाकणे (६०), सोहनबाई पुंडलिक घुगे (६०), कांचन निवृत्ती घुगे (२५), चिऊ अनिल डिघोळे (३) गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ए. एस. जोशी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना केले.