प्रतिनिधी
औरंगाबाद : हुंड्याची मागणी पूर्ण करीत नसल्याने पत्नीस मारहाण करून दुसèया महिलेशी लग्न करणाèया पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयभवानीनगर येथील स्नेहा संतोष पडुळ (३२) हिच्याकडे सासरच्या मंडळींनी वारंवार पैशाची मागणी केली. मात्र पैशाची पूर्तता होत नसल्याने स्नेहा हिला उपाशीपोटी ठेवत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या नेहमीच्याच छळास कंटाळून स्नेहा माहेरी गेली असता सासरच्या मंडळीनी संतोष कचरु पडूळ याचे दुसरे लग्न लावून दिले. या प्रकरणी स्नेहा पडुळ यांच्या तक्रारीवरुन पती संतोष पडुळ, ललीता कचरु पडुळ, गणेश कचरु पडुळ (रा. सर्व एन १३, सिडको) यांच्याविरुद्ध मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार पुरणqसग राजपुत करीत आहेत.