प्रतिनिधी
औरंगाबाद : नवीन औद्योगिक विद्युत मिटरचे इस्टीमेट लवकर देण्यासाठी इलेक्ट्रीक ठेकेदाराकडून २० हजाराची लाच घेणाèया महावितरणचा कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंत्याच्याच कार्यालयात केली.
बीड बाय पास रोडवरील पटेलनगर येथील रहिवाशी शेख तबरेज सरवर अहमद हे व्यवसायाने इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना वडगांव कोल्हाटी येथील राहुल आसाराम प्रधान यांच्या मेसर्स अपेक्षा इन्टरप्रायजेस या फर्मचे औद्योगिक विद्युत मीटरचे नवीन जोडणीचे काम मिळाले होते.त्यावरून त्यांनी फाईल तयार करून वाळूज महानगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जमा केली. तेथील कनिष्ठ अभियंता सुहास दत्तात्रय वरूडे याने सदरील फाईल लवकर मंजुर करण्यासाठी शेख तरबेज यांच्याकडे
२० हजाराची लाच मागितली. त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी रितसर लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. यावरून आज दुपारी कनिष्ठ अभियंता वरूडे याच्याच कॅबीनमध्ये सापळा लावण्यात आला. त्यात वरूडे हा लाचेचे २० हजार रूपये घेतांना रंगेहात पकडल्या गेला. या प्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.