प्रतिनिधी
औरंगाबाद : आंध्र प्रदेशातील अदिलाबाद जिल्ह्यातील सुमारे चाळीस वर्षांच्या एका व्यक्तीने औरंगाबाद रेल्वे स्थानकाबाहेर नगरसोल - नांदेड पॅसेंजर सुमारे अर्धा तास रोखून धरली. तो आधी रेल्वेच्या इंजिनावर आणि त्यानंतर इंजिनाखाली जाऊन बसला होता. बायकोला शोधण्यासाठी त्याने रेल्वे थांबविल्याचे सांगितले.
नेहमीप्रमाणे काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नगरसोल-नांदेड पॅसेंजर औरंगाबाद रेल्वेस्थानकात प्रवेश करीत असताना एक इसम या पॅसेंजरसमोर येऊन उभा राहिला. रेल्वेच्या इंजिन चालकाने गाडीचा वेग आधीच कमी केलेला होता. रेल्वे रूळांवर उभ्या असलेल्या इसमाला पाहून त्याने हॉर्न वाजविला, तरीही तो इसम बाजूला हटेना. त्यावर चालकाने वॉकीटाकीने घटनेची माहिती स्टेशन मास्तर तसेच रेल्वे पोलिसांना दिली आणि रेल्वे थांबविली. रेल्वे थांबताच तो इसम इंजिनावर जाऊन बसला. कुणीतरी माणूस इंजिनावर चढून बसल्याचे पाहून बघ्यांची गर्दी वाढू लागली. गर्दी वाढू लागल्याचे पाहून तो माणूस इंजिनाखाली जाऊन बसला. रेल्वे पोलिस, कर्मचारी तसेच गोळा झालेल्या लोकांनी त्या माणसाला इंजिनाखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले; पण तो काही केल्या तेथून बाहेर येईना. उलट त्याने रेल्वे रूळांवरील खडी उचलून लोकांना फेकून मारण्यास सुरुवात केली. तरीही पोलिसांनी त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर सुमारे अर्धा तासानंतर रेल्वे पोलिसांना त्या माणसाला इंजिनाखालून बाहेर काढण्यात यश आले. त्या व्यक्तीस हिंदी येत नसल्यामुळे त्याने रेलगाडी कशासाठी अडवली तेही कळेना. शेवटी आंध्र प्रदेशातील एका इसमास बोलावून आणून त्याची विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्याने आपले नाव जी. गंगाराम असल्याचे सांगितले आणि आपण आंध्र प्रदेशमधील अदिलाबाद जिल्ह्यातील नरसापूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याने हे सर्व कशासाठी केले हे मात्र सांगितले नाही.