प्रतिनिधी
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचारी महिलेवर गरवारे कंपनीतील कर्मचारी डोळा ठेवून होता. तिने जेव्हा त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिला बदनाम करण्याचे कुभांड रचले आणि फेसबुकवर तिचे फोटो अपलोड केले. महिलेने पोलिसांत धाव घेतल्यानंतर या कू कर्मचाèयाला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील ४० वर्षीय महिलेची एका कार्यक्रमात आबासाहेब डांगेशी ओळख झाली होती. ओळखीत मैत्री झाली आणि त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यानंतर दोघांची मैत्री एका विशिष्ट हद्दीपर्यंत मर्यादित राहिली. जुलै महिन्यात महिलेच्या पतीला हार्टअॅटॅकचा झटक आला होता, तेव्हा डांगेने तिला बरीच मदत केली. त्यामुळे दोघांत चांगलीच जवळीक झाली. एकदा डांगेने तिला चहासाठी बीड बायपासवरील निशांत पार्कमध्ये बोलावले. तिथे ती आली तेव्हा चहा घेताना मोबाईलमध्ये त्याने नकळत फोटो घेतले. नंतर डांगेने मैत्रीचे रुपांत नको त्या संबंधात करण्याची मागणी सुरू केली. महिलेने याला नकार दिला तेव्हा मात्र डांगेतील सद्प्रवृत्ती कुप्रवृत्तीत बदलली आणि मग त्याने धमक्या द्यायला सुरुवात केली. महिलेने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी डांगेला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची जामिनावर मुक्तता क रण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे करीत आहेत.