प्रतिनिधी
औरंगाबाद : ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीत १४ लाख ६० हजारांचा अपहार करणाèया हैदराबाद येथील झोनल मॅनेजर अनुपकुमार यल्लावरती याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आंध्र प्रदेशासाठी २००४ मध्ये कंपनीने अनुपकुमार यल्लावरती यांची झोनल मॅनेजरपदी नियुक्ती केली होती. त्याने ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीची बी-बियाणे देण्यासाठी स्वत:च्या कंपनीच्या नावे रक्कम जमा करावी, अशा सूचना तेथील डीलर आणि डिस्टिड्ढब्युटर्सना दिल्या होत्या. त्यानुसार २००८ ते २०१० या काळात डीलर आणि डिस्टिड्ढब्युटर्सनी लाखो रुपये कांचन सीड्स कंपनीच्या खात्यावर जमा केले. पैसा जमा झाल्यानंतर यल्लावरती याने डीलरना बी-बियाणे देण्यास नकार दिला. यामुळे आंध्र प्रदेशातील डीलर्सनी याची तक्रार ग्रीन गोल्ड कंपनीकडे केली. दोन वर्षांपासून एकसारखे अर्ज येत असल्याने सीड्स कंपनीने चौकशीचे आदेश देत यल्लावरतीविरुद्ध क्रांती चौक पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणात न्यायालयाही धाव घेण्यात आली होती. या प्रकरणात अपहाराचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक शुभांगी देशमुख, नामदेव लोखंडे, पोलिस नाईक दीपक इंगळे आणि शिपाई विवेकानंद औटी यांच्या पथकाने यल्लावरती याला अटक केली.