प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्र परीट - धोबी सेवा मंडळ, संत गाडगेबाबा लाँडड्ढीधारक संघटना, महाराष्ट्र संघटनेचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्रात थाटात संपन्न झाला. या वेळी राज्यातील ५१ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संघटनेच्या पाच ज्येष्ठ सदस्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. पाच जणांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रमाकांत कदम, रेखा कदम उपस्थित होते. औरंगाबाद शहरातील हरिभाऊ लिंगायत आणि श्रीरंग मोरे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास राज्यभरातील नागरिक उपस्थित होते. राजेंद्र बोरुडे, रामदास शिंदे, बी.डी. सूर्यवंशी, कैलास राऊत, नंदकुमार मोरे, अशोक दामले, बाबूलाल बावसीवाल, सांडू आहिरे, नारायण गाडेकर, दामोदर दामले, नंदू राऊत, भिकन वाघमारे, उत्तम वाघ, विठ्ठल शिंदे आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी रामदास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मंगेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर वाघमारे यांनी आभार मानले.