प्रतिनिधी
औरंगाबाद : जुना मोंढ्यातील व्यापारी रमेश पगारिया यांनी दुकानासमोर उभ्या केलेल्या अॅक्टिव्हाच्या डिक्कीतून २ लाख ३० हजार रुपयांची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. जुना मोंढ्यात ही घटना घडली.
जुना मोंढा येथील निर्मल टड्ढेडिंग कंपनीचे मालक रमेश कन्हैयालाल पगारिया (६२, रा. वेदांतनगर) यांनी बँकेत पैसे भरण्यासाठी २ लाख ३० हजार रुपये असलेली पिशवी अॅक्टिव्हाच्या डिक्कीत टाकली होती. बँकेत जाण्याआधी दुकान उघडून द्यावे म्हणून ते जुना मोंढ्यात आले. दुकान उघडून लघुशंकेला गेले आणि परत येऊन पाहतात तो अॅक्टिव्हाची डिक्की उघडी. त्यांनी तातडीने जिन्सी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण चोरटे नक्की कुठून गेले, कुठून आले हे काही कळू शकले नाही. गाडीत रक्कम ठेवून लघुशंकेला जाणे पगारिया यांना चांगलेच महागात पडले. गेल्या काही दिवसांत शहरात अशा स्वरुपाच्या घटना वाढल्या असून, स्वतःच्याच गलथान कारभाराचे नागरिक बळी ठरत आहेत.