प्रतिनिधी
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मुदती पूर्ण होत असल्याने १८ तारखेपासून ग्रामपंचायतीसाठी सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील २२७ ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी नोंद असून यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीची मुदत नोव्हेंबर महिन्यांपर्यंत असल्या कारणाने राज्य निवडणूक आयोगाने सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. औरंगाबाद, गंगापूर तालुक्यासाठी १९ तारखेला निवडणुका होणार आहे. याबरोबच कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द ग्रामपंचायतीसाठी १७ तारीख इतर १८ ग्रामपंचायतीसाठी १८, २०, २१ तारखेला निवडणुका होणार आहे. याबरोबरच खुलताबादेतील २ ग्रामपंचायतीसाठी १८ तारखेला तर आठ ग्रामपंचायतीसाठी २० तारखेला निवडणूक होणार आहे. फुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी १९ तारखेला, सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी १८ रोजी निवडणुका होणार आहे. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील वणगावसाठी २० रोजी तर सावरखेडा ग्रामपंचायतीसाठी आणि इतर ग्रामपंचायतीसाठी २२ तारखेला निवडणुका घेतल्या जाणार आहे. वैजापुर तालुक्यातील खरज ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी १७ तारीख तसेच हनुमंतगाव या ग्रामपंचायतीची निवडणूक १८ तारीख तर इतर ग्रामपंचायतीसाठी २१, २४ तारखेला निवडणुका घेतल्या जाणार आहे. जिल्ह्यातील तब्बल २२७ ग्रामपंचातीचा समावेश राहणार असून यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.