प्रतिनिधी
औरंगाबाद : दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत हळूहळू खरेदीसाठी रेलचेल वाढू लागली आहे. बहुतांश सरकारी नोकरदारांची खरेदी झाली असून, सात ते दहा तारखेपर्यंत खासगी कंपन्यांचे पगार बोनससह होत असल्याने त्यांच्या प्रतीक्षेत बाजारपेठा आहेत. तूर्त, व्यावसायिकांनी दुकाने ग्राहकांसाठी गच्च सजवून ठेवली आहेत.
यावर्षी बाजारात चायना फटाक्यांची आवक वाढली आहे. फटाक्यांचे काही नवीन प्रकार आले असून, ठिकठिकाणी चिनी बनावटीच्या फटक्यांची दुकाने सजलेली दिसताहेत. पाऊस न पडल्याने दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असले तरी दिवाळ सणावर आनंदाचे विरजण कुणीही पडू देत नसल्याचे दिसते.
फटाक्यांचे भाव वाढले
सध्या बाजारात सुरसुèया, भईचक्का, फॅन्सी फटाके, रॉकेट उपलब्ध झाली आहेत. ३०० रुपयांपासून ते हजार रुपयापर्यंत फटाक्यांच्या किंमती आहेत. यावर्षी १० ते २० टक्के भाववाढ झाली आहे. हे फटाके शिवकाशी, जळगाव, अहमदनगर, जालना या जिल्ह्यातून आणले जात आहेत. फटाक्यांच्या दुकांनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. याबरोबरच आग लागताच ती विझविण्यासाठी वाळू, माती याची सुविधा करण्यात आली आहे. टि. व्ही. सेंटर बरोबरच शहरातील जिल्हा परिषद मैदान, राजीव गांधी स्टेडीयम, एन-२ सिडको येथील ज्ञानेश विद्यालय, गारखेडा परिसर आदी ठिकाणी १०० ते १५० दुकाने लावण्यात आली आहेत. महागाई मुळे यावर्षी फटाक्यांच्या किंमती १०-२० टक्क्यांनी वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे, असे फटाका असोसिएशनचे अध्यक्ष रवी मुळे यांनी सागितले.