अल्पवयीन मुलींना वाममार्गाला लावून बलात्कार, औरंगाबाद खंडपीठात सुनावणी
प्रतिनिधी
औरंगाबाद - अवघ्या राज्यभर गाजलेल्या नगरमधील सेक्सकांड प्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली असून, वाममार्गाला लावण्याच्या उद्देशाने फसवून त्यांच्यावर बलात्कार केल्या प्रकरणातील इतर आरोपीं शिक्षा कमी करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी चेतन भळगट बाबतचा निर्णय मात्र राखून ठेवण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यात २००६ मध्ये हे सेक्स कांड उघडकीस आले होते. या प्रकरणात सप्टेंबर २०१० मध्ये नगरच्या जिल्हा न्यायालयाने वीस जणांना जन्मठेप सुनावली होती. त्यावर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होेते. त्याचा निकाल सुनावताना खंडपीठाने हा निर्णय दिला. तुकाराम गेना मिसाळ (वय ४०), रमेश रमाकांत बरकसे (वय ४१), हरजित ज्योतसिंग राजपाल (वय ४०), रामराव डेंगळे (वय ५८), रमाकांत डेंगळे (वय २२), अशोक कासार (वय ४२), विलास कराळे (वय ३२) या सात आरोपींना बलात्कार व पिटा कायद्यान्वये जन्मठेप, अन्य आठ आरोपींना पिटा कायद्यान्वये दहा वर्षे सक्तमजुरी आणि चार आरोपींना आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा खंडपीठाने सुनावली. न्यायमूर्ती अंबादास जोशी आणि न्यायमूर्ती यू. डी. साळवी यांच्या पीठाने हा निकाल दिला. प्रमुख आरोपी भळगटचा निकाल राखीव ठेवला गेला असून, त्याने एका अत्याचारित मुलीशी विवाह केला आहे. त्यावर न्यायमूर्तींनी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. मुख्य आरोपी शीला दिलीप बारगळ हिचे जिल्हा न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वीच निधन झाले. अपघातात जखमी झाल्याने सतीश बन्सी पाथरे याचा खटला प्रलंबित आहे, तर आरोपी राम साळवे फरार आहे.
घटनेची पाश्र्वभूमी... नगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात २४ फेब्रुवारी २००६ रोजी १४ वर्षांच्या मुलीने २२ जणांवर बलात्काराची तक्रार नोंदवली होती. शीला बारगळ हिचे घर, वेगवेगळी हॉटेले, धुळे येथील आरोपीच्या घरात वेळोवेळी अत्याचार झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित झाला होता.