प्रतिनिधी
औरंगाबाद : घरात घुसून कपाट खोलण्याच्या तयारीत असलेला चोर घरमालकाच्या हुशारीमुळे पकडला गेला. जवाहरनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी सांगितले, की श्री. ओकले यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर हा सर्वांची नजर चुकवून गेला. मात्र वेळीच ही बाब ओकले यांच्या लक्षात आल्याने त्यांनी संशयावरून कोण आहे, म्हणून पाहिले तर चोर चक्क कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने दूरध्वनी करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिस लगेच घटनास्थळी आले आणि त्यांनी मोठ्या शिताफीने चोरांच्यास मुसक्या बांधल्या. भरदिवसा, गजबजलेल्या वस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.