भारत असो वा अमेरिका सध्या चर्चा सुरू आहे, ती दुसèया टर्मची. भारतात गेल्या काही दिवसांपासून सर्वांत मोठा राजकीय विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळणार की नाही, यावर तिखटमीठ लावून चर्चा सुरू आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गडकरी यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केल्यापासून गडकरींची पक्षाध्यक्षपदाच्या दुसèया टर्मची संधी वांध्यात सापडली आहे. पक्षांतर्गत वाढता विरोध असूनही पक्षाच्या नेत्यांनी बराच खल केल्यानंतर मंगळवारी गडकरींना भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या मुद्यावर क्लिनचीट दिली. यामुळे गडकरींच्या पक्षाध्यक्षपदाच्या दुसèया टर्मचा मार्ग मोकळा झाल्याचे मानन्यात येत असले तरी अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, हेही तेवढेच खरे. भारतात या घडामोडी सुरू असल्या तरी तिकडे बराक ओबामा यांनी मात्र जगभराचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसèयांदा बाजी मारून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे जगाचा बादशाह समजला जातो. २००८ साली ओबामा यांनी पहिल्यांदा या पदासाठी ४ नोव्हेंबर २००८ रोजी झालेली निवडणूक qजकून अमेरिकेचा पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्याचा इतिहास घडविला होता. त्यावेळी ओबामा यांना ती निवडणूक अतिशय सोपी गेली होती. त्या निवडणुकीत त्यांनी आपले रिपब्लिकन प्रतिस्पर्धी जॉन मॅककेन यांना पराभूत केले होते. मॅककेन यांना ४५.७ टक्के तर ओबामा यांना ५२.९ टक्के मते मिळाली होती. अमेरिकेच्या अध्यक्षाची निवड ज्या इलेक्टोरल मते मिळण्याच्या आधारावर केली जाते, त्यांचा विचार केला तर त्यावेळी ओबामांना ३६५ आणि मॅककेन यांना १७३ इलेक्टोरल मते मिळाली होती. त्यावेळी ओबामा यांच्या ‘यस, वुई कॅनङ्क या शब्दांनी अमेरिकन जनतेला भुरळ घातली होती आणि त्यांनीही ओबामांच्या पारड्यात भरघोस मते टाकून अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. यावेळीही ही माळ पुन्हा ओबामांच्याच गळ्यात पडली आहे. दुसèया महायुद्धानंतर बिल क्लिंटन यांच्याशिवाय कोणत्याही डेमोक्रॅटिक उमेदवाराला सलग दुसèयांदा अध्यक्षपदी निवडून येणे शक्य झाले नव्हते. यावेळी मात्र ओबामा यांनी हाही विक्रम आपल्या नावे केला. यंदाच्या निवडणुकीत आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व, स्थलांतर, दहशतवाद आणि आऊटसोर्सिंग आदी मुद्यांवर ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मिट रोमनी यांनी प्रचारावर भर दिला होता. पण या साèयाच समस्यांवर समाधानकारक उत्तर देण्याची क्षमता ओबामांमध्येच आहे, यावर विश्वास ठेवून अमेरिकेच्या जनतेने त्यांना समर्थन दिले आहे. बेकारी हटवून डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्याची जादू घडवण्यासाठी जनतेने ओबामांना पुन्हा संधी दिली आहे. असे असले तरी यंदाची निवडणूक ओबामांना सोपी नव्हती, हे मात्र खरे. गेल्या दोन महिन्यांच्या प्रचारामध्ये असलेली बराक ओबामा आणि मिट रोम्नी यांच्यातील बरोबरीची स्थिती होती. देशभरात घेण्यात आलेल्या मतदानपूर्व मतचाचण्यांमध्ये ओबामा आणि रोम्नी यांना जवळपास समसमान पसंती मिळाली होती. या निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवार समोरासमोर उभे ठाकले त्यावेळी तीनपैकी पहिल्या वादात रोमनी यांनी बाजी मारून ओबामांना यंदाची निवडणूक सोपी नाही, हे दाखवूनही दिले होते. रोमनी यांनी प्रचाराच्या बाबतीत ओबामांची बरोबरी साधल्याचे दिसून येत होते. त्यामुळे ओबामा पुन्हा निवडून येतीलच, याची खात्री कोणीही देऊ शकत नव्हते. एवढेच नव्हे तर ओबामा आणि रोम्नी यांच्यातील निवडणूक अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात बरोबरीत असल्याने सन २००० मधील निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता व्यक्त होत होती. त्या निवडणुकीमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला होता. ही परिस्थिती लक्षात घेत संभाव्य अडचणी, मतदानातील त्रुटी आणि पुनर्मोजणी यांना कायदेशीर मार्गाने सामोरे जाण्याची तयारी ओबामा आणि रोम्नींच्या कॅम्पेन टीमने केली होती. मात्र, ती वेळ आली नाही. ओबामांनी 303 इलेक्टोरल मते मिळवून रोमनी यांच्यावर मात केली. अर्थात, ओबामा यांना महिलांसह हिस्पॅनिक्ससारख्या अल्पसंख्याक गटाचा जोरदार पाqठबा मिळाला असला, तरीही गेल्या निवडणुकीपेक्षा आ‘्रिकन-अमेरिकन वंशाच्या नागरिकांमधील ओबामांचा पाqठबा घटल्याचे दिसून आले आहे. गेल्या वेळी ओबामांना मिळालेली इलेक्टोरेल मते आणि यावेळी मिळालेली मते यामध्ये सुमारे 60 चा फरक आहे. त्यावरून त्यांची लोकप्रियता घटल्याचे स्पष्ट होते, हेही येथे आवर्जून सांगावे लागेल. अर्थात, हे सारे असले तरी ओबामा पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. गेल्या वेळी ओबामा निवडून आले, त्यावेळी अमेरिका पूर्णत: मंदीच्या खाईत अडकलेली होती. त्यांच्यापुढे आपल्या देशाला या मंदीतून बाहेर काढण्याचे आव्हान होते. नंतर अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी विविध स्वरूपांचे काही कठोर निर्णय घेऊन या मंदीवर मात करण्यासाठी प्रयत्नही केले. काहीअंशी त्यांना त्यामध्ये यशही आले. ओबामा अर्थव्यवस्थेत प्राण फुंकू शकतात, असा विश्वास त्यामुळेच जनतेत निर्माण होऊ शकला. शिवाय बेरोजगारी, आऊटसोर्सिंग आदी समस्यांवरही मात करण्याची ताकद केवळ ओबामांकडेच आहे, असेही तेथील तरुणांना वाटले. त्यामुळेच यंदा त्यांना जनतेने पुन्हा संधी दिल्याचे दिसून येते. ओबामांच्या पहिल्या कार्यकाळातच अमेरिकेच्या सैनिकांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानात घुसून खात्मा केला होता. अमेरिकेने दहशतवादावर मिळविलेला हा मोठा विजय मानला गेला. लादेनच्या खात्म्याच्या या मोहिमेचे नेतृत्त्व स्वत: ओबामांनी केले. ही मोहीम पूर्ण संपेपर्यंत ते मागे हटले नाहीत. यामुळेही अमेरिकेसह अवघ्या जगाची डोकेदुखी ठरत असलेल्या दहशतवादासारख्या समस्येवर मात करण्याची क्षमता केवळ ओबामांकडेच आहे, असा विश्वास निर्माण झाला. ओबामांच्या विजयामागे हेही एक कारण आहे. अर्थात, या साèया समस्या संपल्या आहेत, असे मात्र नाही. त्यामुळे आता अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसèयांदा विराजमान होणाèया ओबामांना अजूनही या समस्यांवर अंतिम तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहे. जागतिक मंदी अजून संपलेली नाही. या मंदीवर, वाढत्या बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्याच्या हेतूने ओबामांना कंबर कसावी लागणार आहे.