प्रतिनिधी
औरंगाबाद : पुणे येथील शिवाजीनगर एस. टी. बस डेपोची बस नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून धडकल्याने बसचालक जागीच ठार झाला, तर १० प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात ‘ंगळवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद-पुणे महामार्गावरील ढोरेगाव पेट्रोल पंपाजवळ झाला. जखमींना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजय शिवाजी नामदार (४२, रा. पुणे) असे या अपघातात ठार झालेल्या बसचालकाचे नाव आहे. या अपघातात बसमधील शेख फारुक शेख सिद्दीकी (४४), नितीन काशीनाथ पाटील (२५), समर सुनील स्वामी (२२) अमोल भगवान पाटील (२७), राजू माधवराव तळेकर (३८) माणिक विनायकराव देशमुख (४८), बाबूराव देवराव उमखडे (६०), वसंत विश्वनाथ व्यवहारे (४४), एस. एस. घारडे (४०) हे प्रवासी जखमी झाले आहेत. पुणे येथील शिवाजीनगर आगाराची एस. टी. मंगळवारी रात्री प्रवाशांना घेऊन औरंगाबाद येथून पुण्याकडे निघाली होती. ढोरेगाव पेट्रोल पंपासमोर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर उभा होता. अंधारामुळे बसचालकास त्यांचा अंदाज न आल्याने बस रात्री पावणेअकराच्या सुमारास पाठीमागून ट्रकवर जाऊन धडकली. यात बसचालक नामदार यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी जखमींना ताबडतोब औरंगाबाद येथील शासकीय वैद्याकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविले. अपघाताची माहिती मिळताच एसटीचे विभाग नियंत्रक संजय सुपेकर, विभागीय वाहतूक अधिकारी पी. एम. हजारे, औरंगाबाद आगार क्र. २ चे वरिष्ठ आगारप्रमुख किशोर सोमवंशी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींमध्ये एस. टी. च्या तीन कर्मचाèयांचा समावेश आहे.