प्रतिनिधी
औरंगाबाद : औरंगाबाद, अहमदनगर,नाशिक या जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या पावन स्मृतीस तसेच सद्गुरु नारायणगिरी महाराजाचे स्मृती स्थान श्री.क्षेत्र सराला बेटाचा समावेश शासनाच्या पर्यटन विकास आराखड्यात करण्यात आलेला आहे.
श्री.क्षेत्र स्थळाचा भाविकांच्या दृष्टीने विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत मंत्री छगन भुजबळ यांनी बेटाचे मठाधिपती हभप रामगिरीजी महाराज यांच्या कडे साडेतीन कोटींचा निधी धनादेश सुपूर्द केला आहे. या समयी माजी आ. जयंत ससाणे, आ.भाऊसाहेब कांबळे यांच्याशिवाय विश्नाथ मुंढे उपस्थित होते. या निधीच्या रक्कमेतून बेटाच्या विकासाची कामे तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत. एक कोटी एकसष्ट लक्ष रुपये सभा मंडपासाठी खर्च करण्यात येणार आहेत. स्वच्छता गृहासाठी ३२ लक्ष रुपये, सभागृह व अतिथी गृह २० लक्ष रुपये पार्किंग शेडसाठी नऊ लक्ष रुपये मालेवाडी ते सराला बेट या चार कि.मी च्या डांबरीकरणासाठी ५५ लक्ष रुपये खर्च करण्यात येईल, असे हभप रामगिरी महाराज यांनी सांगितले. या निधीमुळे सराला बेटचे महाराजांचे सेवेकरी मधुकर महाराज, चंद्रकांत महाराज, मकरंद सोनवणे, अनिरुद्ध नाईक, डॉ. मनोज चव्हाण, धोंडीरामसिंह राजपूत, दीपक करकसे आदी मोठ्या संख्येने भाविकांनी आनंद व्यक्त करून शासनाला धन्यवाद दिले.