प्रतिनिधी
औरंगाबाद : सिडकोतील २५ वर्षीय युवकाने विष घेऊन आत्महत्या केली. विशाल साहेबराव लोखंडे (२५, सिडको एन-६) असे मृताचे नाव आहे. जालना रोडवरील केम्ब्रिज शाळेजवळ लोखंडे याने विष घेतले. त्याला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.