प्रेम केवळ मानवाचे आयुष्यच बदलत नाही तर रक्तदाबही नियंत्रणात ठेवत असल्याचा दावा नुकताच शास्त्रज्ञांनी एका संशोधनातून केला आहे. बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांनी सांगितले, की जोडीदाराची सोबत लाभल्याने मोठ्या प्रमाणावर तणाव दूर होतो. जवळचा व्यक्ती जेव्हा एखादा भावनात्मक सल्ला देते तेव्हा नकारात्मक विचार कमी होऊन आणि कोणत्याही प्रकारच्या तणावातून लवकर सावरता येते, असे संशोधक म्हणाले. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल तर ब्लडप्रेशर वाढते. सोबतच संशोधनात असेही निष्पन्न झाले की अविवाहित लोकांमध्ये असलेले ब्लडप्रेशर विवाहित लोकांच्या तुलनेत अत्यंत कमी होते.