औरंगाबाद :येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अलीकडेच बांधकाम केलेल्या इमारतीच्या छताचे प्लास्टर पडून दोन महिला वकील जखमी झाल्या.
औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची नवी इमारत अलीकडेच बांधण्यात आलेली आहे. या इमारतीतील वकीलांसाठीच्या कक्षात नेहमीप्रमाणे आजही वकील मंडळी बसलेली होती. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वकील कक्षाच्या छताच्या प्लास्टरचे काही तुकडे अचानक पडले. त्यामुळे अॅड. रूपाली धुरे आणि अॅड. रंजना गायकवाड या दोन महिला वकील जखमी झाल्या. या घटनेमुळे काही वेळ वकील आणि वकील कक्षात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या इमारतीचे बांधकाम अलीकडेच करण्यात आलेले असल्यामुळे या बांधकामाविषयी शंका उपस्थित करण्यात
येत आहेत.