प्रतिनिधी
औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे भुखंड बककविणाèया सहा जणांविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रजिष्ट्री कार्यालयातील काही कर्मचारी अडकण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील गट क्रमांक १६ येथे नियोजित परिवर्तन गृहनिर्माण संस्थेची दिड एकर जमीन आहे. त्यात असलेल्या प्लॉट मधून एक मोठा प्लॉट जाधववाडी परिसरातील शिवशंकर कॉलनी येथील रहिवाशी असलेले अभिजित म्हस्के आणि भाऊसाहेब पगार (रा. पैठण) यांनी २५ मार्च रोजी प्रॉपर्टी एजंट सलीम पटेल यांच्या मार्फत दीपाली कोटगिरे यांच्याकडून १६लाख ९५ हजारात खरेदी केला होता. कोटगिरे यांनी हा भुखंड रामभाऊ पेरकर यांच्याकडून खरेदी केलेला होता. या व्यवहारानंतर आरोपी दिपाली कोटगीरे, अशिष कोटगिरे, शेख सलीम उर्फ सलीम पटेल, नसीम खान, नरेश पोतलवाड, रामभाऊ उध्दवराव पेरकर यांनी सदरील भुखंडाचे बनावट कागदपत्रे तयार करून तो बळकावला. या प्रकरणी वरील सहा आरोंपीविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.