Home » , » किशोर निकम यांच्या नृत्यविभ्र प्रदर्शनास आजपासून जहांगीरमध्ये प्रारंभ

किशोर निकम यांच्या नृत्यविभ्र प्रदर्शनास आजपासून जहांगीरमध्ये प्रारंभ

Written By Aurangabadlive on बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२ | ८:४५ PM

छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार उदघाटन
प्रतिनिधी

औरंगाबाद :  शहरातील नामवंत तरुण छायाचित्रकार किशोर निकम यांनी आगळ्यावेगळ्या शैलीत टिपलेल्या नृत्यांच्या छायाचित्रांच्या नृत्यविभ्र या प्रदर्शनाला उद्या, दि. २९ पासून मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रारंभ होत असून, प्रदर्शनाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दुपारी बाराला होत आहे. या वेळी प्रख्यात हवाई छायाचित्रकार गोपाल बोधे तसेच वरिष्ठ छायाचित्रकार काकुभाई कोठारीही उपस्थित राहणार आहेत. ५ डिसेंबरपर्यंत चालणारे हे प्रदर्शन श्री. निकम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला समर्पित केले आहे.
फाईन आर्टचे विधिवत शिक्षण घेतलेल्या निकम यांनी आपले करिअर केले ते छायाचित्रणामध्ये. वर्तानपत्रांपासून ते मॉडेqलग, स्टील फोटोग्राफी, कॅलेंडरसाठी, चित्रपटांसाठी स्टील असे अनेक प्रकार हाताळत, अनेक मोठ्या छायाचित्रकारांच्या हाताखाली काम करत त्यांनी आपले छायाचित्रणातील कौशल्य विकसित केले. मात्र छायाचित्रण करताना आपल्यातील चित्रकार कलावंत त्यांनी सतत जागा ठेवला आणि प्रत्येक छायाचित्र काढताना नवीन काय, वेगळे काय करता येईल असा प्रयत्न केला. छायाचित्रणाचे अनेक प्रकार हाताळताना नृत्यातील आस हा चित्रकार हाताळत असलेला प्रकार कॅमेèयाच्या माध्यमातून साधता येईल, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्या दिशेने कामाला प्रारंभ केला. नर्तक नृत्य करताना जसजसा विविध हालचाली करतो, गती, लय यांचा मेळ साधत आपली कला सादर करतो, तसा त्याच्या पाठोपाठ त्याची प्रतिमाही पुढे-पुढे जाते. या प्रतिमेत असते कलावंताची गती, त्याचे विभ्र, सूर, ताल आणि लयही. हे चित्रकार सहज साकारु शकतात कारण त्यांना हळुहळू गडद होत जाणारी प्रतिमा प्रत्यक्ष रेखाटता येते. छायाचित्रकाराला याबाबत मर्यादा येतात कारण छायाचित्राच्या एका फ्रेममध्ये हे सारे कसे सामावणार? किशोर निकम यांनी कॅमेèयाच्या मर्यादांबरोबरच त्यातील ताकदीचाही विचार केला आणि शटरस्पीड, अ‍ॅपरचर यांच्या अभ्यासाने, वापराने, सरावाने अशा प्रतिमा साकारण्याचा प्रयत्न सुरु केला. एक-दोन नव्हे तब्बल आठ वर्षे त्यांनी अशा प्रकारची हजारो छायाचित्रे काढली. औरंगाबादला होणारा वेरुळ- अqजठा महोत्सव त्यांच्याकरिता पर्वणीच ठरला. अनेक कलावंतांची छायाचित्रे त्यांनी काढली. श्री. निकम यांनी टिपलेल्या चार हजारापेक्षा जास्त छायाचित्रांधून केवळ चाळीस निवडक छायाचित्रे नृत्यविभ्र प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत आणि ही छायाचित्रे प्रख्यात नृत्यांगणा हो मालिनी, पार्वती दत्ता, राही होता आणि डॉ.
लिना गुप्ता आदींची आहेत.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.