बस्स एक गोळी... भीती होईल क्षणात दूर...
थोड्याही उंचीवर गेल्यानंतर काही जणांना भीती वाटायला सुरुवात होते. उंच जागेवरून आपण खाली पडू, असे त्यांना वाटत असते. पण आता ही भीती क्षणात दूर करण्याचे काम शास्त्रज्ञांनी केले असून, त्यांनी एक अशी गोळी तयार केली आहे, जी खाल्ल्यानंतर लगेच भीती दूर पळते... स्विझरलँडच्या बेसेल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी भीतीचे हार्मोन नियंत्रित करण्याकरिता कार्टिसोल नावाची गोळी तयार केली आहे. ही एक गोळी एक्रोफोबिया म्हणजे उंचीवर उभे राहण्याची वाटणारी भीती नाहिशी करते. आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती प्रदान करण्याबरोबरच सर्व qचता दूर करण्याची क्षमता या गोळीत आहे. संशोधकांनी ही गोळी तयार केल्यानंतर ४० लोकांवर तिचा प्रयोग केला. या लोकांना गोळी दिल्यानंतर उंच डोंगरावर जाण्यास सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे, एरव्ही थोड्याही उंचावर उभे राहण्यास घाबरणारे हे लोक उत्साहाने डोंगरावर चढले आणि शिखरावर उभे राहिले. तीन ते पाच दिवस त्यांच्यातील हा उत्साह कायम होता. सलग एक महिने त्यांनी गोळी घेतल्यावर त्यांच्यातील भिती कायमची नष्ट झाली. हे संशोधन प्रोसेqडग ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स या आरोग्यविषयक पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे.