प्रतिनिधी
औरंगाबाद : कारमधून सव्वा दहा लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी बाबा पेट्रोलपंपाजवळ घडली होती. दागिन्यांची बॅग लांबवणारे चोर सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून, हे चोरटे महावीर चौकातील सीसीटीव्ही कॅमेèयात कैद झाल्याने त्यांना अटक करणे सोपे झाले आहे.
शनिवारी सकाळी समर्थनगर येथील श्री अपार्टमेंट येथे राहणारे आनंद पुराणिक यांनी लक्ष्मीपूजनासाठी बँकेत ठेवलेले ३४० ग्रॅमचे सोन्याचे आणि १० ग्रॅमचे चांदीचे दागिने काढले. त्यांना पुण्याला जायचे होते. अल्टो कारच्या सीटवर दागिन्यांची बॅग ठेवून ते बाबा पेटड्ढोलपंप येथे पेटड्ढोल भरण्यासाठी आले. पेटड्ढोल भरल्यानंतर त्यांनी कार मध्यवर्ती बसस्थानकाकडे वळवली तेव्हा मागच्या सीटवरील बॅग गायब होती. आनंद पुराणिक यांच्यासोबत त्यांचा एक मित्र समोरच्या सीटवर बसलेला होता. पोलिसांनी त्या दोघांकडे अधिक विचारपूस केली असता बँकेपासून त्यांच्या दोन्ही बाजूला दोन मोटारसायकली महावीर चौकापर्यंत होत्या; पण संशय न आल्याने त्यांनी हटकले नाही. बँकेपासून पाठलाग करत असलेल्या दोन्ही दुचाकीबाबत महावीर चौकात बसविण्यात आलेल्या कॅमेèयांमधील फुटेज तपासले असता त्यात चोर स्पष्टपणे दिसून आले. आता या दुचाकीस्वारांचा शोध घेतला जात आहे.