प्रतिनिधी
औरंगाबाद : अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे उपकेंद्र औरंगाबादेत उभारण्यात येणार असून, त्यासाठी औरंगाबादपासून २३ किलोमीटर अंतरावर जागाही देण्याचे शासनाने मान्य केले आहे. पण विद्यापीठाच्या नावात मुस्लिम शब्द असल्याने काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. वास्तविक या विद्यापीठात सर्वच जाती- धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात, अशी स्पष्टोक्ती स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित पत्रपरिषदेत मुजतबा मुनीब व तौफिक यांनी दिली.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची पाच केंद्रे प्रस्तावित आहेत. त्यात औरंगाबादचाही समावेश आहे. मात्र, एक वर्ष लोटले तरी अद्याप विद्यापीठाच्या उपकेंद्र स्थापनेसाठी जागा देण्यात आलेली नाही. विद्यापीठाची उपकेंद्रे केरळ, पश्चिम बंगाल व बिहारमध्ये आहेत. या विद्यापीठाचे केंद्र औरंगाबादला झाल्यास औरंगाबादच्या मुलांना चांगले आणि आधुनिक शिक्षण मिळणे सोपे होईल. काही लोकांनी या उपकेंद्राच्या स्थापनेला कदाचित नावामुळे विरोध केला असेल. त्यांनी गैरसमज करून घेतला आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. खरे तर हे विद्यापीठ मुस्लिम किंवा अल्पसंख्याकांसाठी नाहीच. सहा महिन्यांत उपकेंद्र स्थापनेविषयी कारवाई न झाल्यास एसएफआय, एसएसएस, बामसेफ, शिवधर्म, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी समविचारी संघटनांना सोबत घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेत स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी मोहम्मद अली व शेख नासेर यांची उपस्थिती होती.