प्रतिनिधी
औरंगाबाद : कंपनीतून कार चोरून नेणारा दुसरा तिसरा कुणी नसून आपलाच सुरक्षा रक्षक आहे, हे जेव्हा कंपनी मालकाला कळले तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. एमआयडीसी पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील लीप प्रिसीजन कंपनीत सुरक्षारक्षक असलेला गणेश धुमाळ (रा. भेंडाळा, ह. मु. रांजणगाव शेणपुंजी) याने कंपनीच्या की-बॉक्समधील किल्ली काढून कंपनीतील इंडिका कार चोरून नेली होती. धुमाळ अहमदनगर जिल्ह्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी नगर जिल्ह्यात धुमाळ याचा त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊन त्याला पकडले. तो श्रीगोंदा रस्त्यावर कारसह पळून जात होता.