प्रतिनिधी
औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट विकणारा डॉक्टर व त्याच्या दोन साथीदारांवर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काशीनाथ माधव गोलांडे (४८, रा. सिडको महानगर) यांच्या दुकानात डॉ. दीपक वैद्यनाथ सिंह (२७) याचे क्लिनिक होते. डॉ. दीपकने आपले वडील वैद्यनाथ सिंह व प्रमिला अशोक दौडमनी (रा. सिडको एन-२, औरंगाबाद) यांच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे गोलांडे यांना तीसगाव शिवारातील प्लॉट ५ लाख रुपयांत १४ जुलै २०१० रोजी विकला. गोलांडे हे प्लॉटची कागदपत्रे घेऊन तलाठ्याकडे फेर करण्यासाठी गेले तेव्हा हा प्लॉट दुसरा व्यक्ती आपल्या नावावर करून असल्याचे समजले. नंतर गोलांडे यांनी दीपकला पैसे परत मागितले पण तो तेही देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे गोलांडे यांनी पोलिसांत धाव घेतली.