प्रतिनिधी
औरंगाबाद : वडिलोपार्जित जमिनीचा फेर घेताना कागदपत्रांवरील तारखेत खाडाखोड करून पंचाच्या सह्या करणारा तलाठी निलंबित करण्यात आला आहे.
कचरू नामदेव चव्हाण (रा. औरंगाबादेतील साऊथ सिटी, सिडको, वाळूज) यांची सिद्धनाथ वडगाव येथे वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या भावंडांमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या जमीन वाटपानुसार त्यांनी फेर घेण्यासाठी तलाठी सज्जास अर्ज दिला होता. मात्र, दस्तऐवज नोंदणीकृत नसल्याने फेर शक्य नाही, असे त्यांना कळविण्यात आले. या जमिनीचा फेर घेण्यात आल्याचे चव्हाण यांना समजले. त्यांनी फेर ज्या आधारे घेण्यात आला ती सर्व कागदपत्रे माहितीच्या अधिकारात मिळविली. तलाठी राजेंद्र पवार (सिद्धनाथ वडगाव सज्जा) यांनी तारखेत खाडाखोड करणे, पंचाच्या सह्या करणे, जमिनीबाबत दिवाणी वाद चालू नाही, असे स्टॅम्प पेपरवर खोटे लिहिल्याचे त्यातून स्पष्ट झाले. ही बाब चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी राजेंद्र पवार यांना तात्काळ निलंबित केले.