Home » , » बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई

बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई

Written By Aurangabadlive on शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२ | १०:०२ AM

प्रतिनिधी
औरंगाबाद : जिल्हा परिषदे अंतर्गत चालविल्या जाणाèया प्राथमिक आरोग्य केंद्रात १४२ बोगस डॉक्टर काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे जि.प. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद माने यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांपैकी अनेक डॉक्टर बोगस असल्याच्या तक्रारी जि.प. आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या. त्यावर जिल्हाधिकारी प्रशासनाने केलेल्या तपासणीत १४२ डॉक्टर बोगस असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. तपासणीत बीएएमएस, बीएचएमएस असे डॉक्टर वगळता ज्या डॉक्टरांनी इतर राज्याचे प्रमाणपत्र घेतले आहे. अशा डॉक्टरांना कारवाई केली जाणार आहे. बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांना सेवा देण्याचा दर्जा घसरला असून, अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे नोंदणीकृत डॉक्टर नसणाèयांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे डॉ. प्रमोद माने यांनी सांगितले.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.