प्रतिनिधी
औरंगाबाद : मोबाइलचे रिचार्ज व्हाऊचर आणण्यासाठी दुकानावर जाणाèया गारखेडा परिसरातील युवकाला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली व त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला.
गजानन कॉलनी येथील चंद्रशेखर सुभाष शेवाळे (२५) हा राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ मोबाइलचे रिचार्ज व्हाऊचर घेण्यासाठी जात होता. त्याला वैभव सुभाष उदावंत, महेश उदावंत आणि किशोर उदावंत या तिघांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच वैभवने शेवाळेच्या डोक्यात लोखंडी अँगल मारून त्याला गंभीर जखमी केले, तर महेश उदावंतने त्याच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून तिघांनी पळ काढला. तिघांविरुद्ध याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.