प्रतिनिधी
औरंगाबाद : तरुणाला मारहाण करून लुटणारे दोघे जण चिकलठाणा एमआयडीसी पोलिसांनी पकडले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून, अटक करण्यात आली आहे.
चिकलठाणा येथील रहिवासी विशाल देवीदास पोहरकर (२३) हा सिंधीबन कॉलनी येथे वीज बिल वाटप करीत होता. त्यावेळी मनोज पट्टेकर, राहुल रघुनाथ हिवराळे (दोघेही रा. सिंधीबन कॉलनी) आणि एका अनोळखी तरुणाने त्यास बोलावले. तुझ्याशी आमचे काम आहे, असे सांगून ते विशाल यास कासलीवाल प्लॉटिंगसमोर घेऊन गेले. तेथे त्यांनी त्याला मारहाण करण्याची धमकी देत त्याच्याकडील रोख ३०० रुपये आणि ५०० रुपये किंमतीचा जुना मोबाईल हँडसेट बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर ते तेथून पळून गेले. विशालने तातडीने एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली.